तळोदा। वनक्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सोमावल वनरक्षक सुरेश देसले यांना सुवर्णपदक नुकतेच राज्यपाल व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा प्रमुख उपस्थितीत मुबंई येथे मंत्रालयात देण्यात आले. यावेळी वनमंत्री सुधीर मुंगूट्टीवार दीपक केसरकर आदी उपस्थित होते. वन संपत्ती सरंक्षक व सर्वधनांचे काम प्रभावीपणे करणार्या अधिकारी व कर्मचारी यांचे मनोधर्य वाढविण्याकरिता राज्यस्तरवरून हा पुरस्कार दिला जातो. सुरेश देसले यांनी या पूर्वी ओघनी वनक्षेत्र खापर तालुका अक्कलकुवा येथ काम केलं असून तळोदा वनक्षेत्रात आमोनी ,अरेठी वनक्षेत्रात ,उत्कृष्ट काम केलं आहे. महाराष्ट्र राज्यातील दिला जाणारा हा पुरस्कार राज्यातील विविध वनक्षेत्रात काम करणार्या वनरक्षक ,वनपाल,वनक्षेत्रपाल सहायक वन सरंक्षक विभागीय वनाधिकारी यांना दिला जातो.
देसले यांनी केलेले काम
सुरेश देसले यांनी वनरक्षक म्हणून केलेले उल्लेखनीय काम विविध प्रशिक्षणात सहभाग तसेच वनसरंक्षक व गुन्हा कामी वन वणवा नियंत्रण , वृक्ष लागवड श्रमदानातून वन्यपशु व पक्षी यांच्याकरिता कार्य मानव व वन्यप्राणी संघर्ष व सहउपाय योजना केल्यात. यासोबतच सुरेश देसले यांनी जागतिक स्तरावर दुर्मिळ झलेल्या गिधाड पक्षी जखमी अवस्थेत वाल्हेरी नदीतून सुखरुप बाहेर काढून प्राण वाचविले. त्यांनी गुजरात राज्यहद्दीत सापडलेल्या दुर्मिळ स्टार प्रजातीचा कासवास सुखरूप गुजरात वनविभागाचा हवाली केल. सिलिंगपूर वनक्षेत्रात मृत तरस आढल्याने त्याची वरिष्ठच्या मार्गदर्शन खाली नियमानुसार अंत्यसंस्कार केले. तसेच शालेय विद्यार्थी व कर्मचारी ग्रामस्थ यांचा मदतीने वन्यप्राण्यांसाठी छोटे बांधारे तयार केलं आहेत. याबाबत सहायक वन सरंक्षक बी,एन पिंगळे वनक्षेत्रपाल अशोक पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.