तळोदा । येथील नगरपालिकेच्या मालकीचे आरक्षण क्र 6 स न 2 व 3 ब जागेवर नव्याने बांधण्यात आलेले भाग क्र 4 चे एकूण 38 गाळ्यांचा भाडे पट्ट्याने देणेकामी आज दिनांक 20 मार्च रोजी नगरपालिका आवारात सकाळी 11 वा आयोजित करण्यात आला होता. बहुचर्चित तळोदा व्यापारी संकुलाच्या लिलाव आज पालिकेत पार पडला यात एकूण 38 पैकी अवघ्या 33 ( गाळ्यांचा) दुकानाचा लिलाव झाला. तळोदा पालिकेच्या वतीने आज नियोजन प्रमाणे पालिकेचा आवारात सकाळी 11 वाजता प्रक्रिया घेण्यात आली.
सर्वात मोठी बोली 3 लाख 85 हजाराची
ही लिलाव प्रक्रीयेवेळेस डी. डी. भरलेले इच्छुक उपस्थित होते. पालिकेच्या वतीने अगोदरच जाहीर केल्याप्रमाणे सरकारी बोली लावण्यात आली. यांत सर्वात मोठी बोली 3 लाख 85 हजार रुपये इतकी गाळे नंबर 108 ला लावण्यात आली. तर पांच गाळ्यांचा बोलीसाठी पुढं कोणीच न आल्याने बोली लागलीच नाही. 38 गाळ्यांसाठी लिलाव करण्यात येत असतांना पाच गाळ्यांच्या बोलीला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा लिलाव होऊ शकला नाही. अशाप्रकारे केवळ 33 गाळ्यांचा लिलाव करण्यात आला. मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच वाक्चातुर्यांमूळ पालिकेचा फायदा झाला आहे. यात गाळे नंबर 98साठी सरकारी बोली पुढे कोणी बोलत नव्हते. अश्या वेळी मुख्यधिकारी जनार्धन पवार यांनी वास्तूशास्त्रानुसार हे दुकान कसे योग्य आहे याबाबत माहिती उपस्थितींना दिली. यानंतर हा गाळा 1 लाख 96 हजाराला गेला. याबाबत पवार यांनी वास्तू शास्त्रचा वापर करत पालिकेचा फायदा करून दिल्याची चर्चा होती. तर गाळे नंबर 99 ते 104 यांची बोली इच्छुक पुढे न आल्याने लागलीच नाही. या लिलावात सहभागी इच्छुकांनी पाच गाळ्यांसाठी बोली लावली नाही. यावेळी मुख्यधिकारी जनार्दन पवार , तहसीलदार योगेश चंद्र, न पा कर्मचारी , राजेश पाडवी ,अश्विन परदेशी, नितीन शिरसाठ, मोहन माळी, विजय सोनवणे, गणेश गावित , प्रशांत ठाकूर ,विनय नाईक , उपस्थित होते