तळोदा । सोमवारी एकटी आढळून आलेली 2 वर्षीय बालिका पोलिसांच्या प्रयत्नानी 24 तासात आई-वडीलांकडे सुपूर्द करण्यात आली. आपले बाळ मिळाल्यामुळे वडिलांचा चेहर्यावर हास्य फुलले होते. गुलाब खात्र्या पाडवी यांची ही बालिका असून ती काल बसस्थानकात रडताना आढळली होती. पोलिसांनी सोमवारी व मंगळवारी शोध घेतल्यानंतर मंगळवारी शोध लागला.
कामगार वसाहतींसह विविध ठिकाणी तपास
शेवटी या महिलेला व बालिकेला पोलिस स्टेशनला नेले त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक यादवराव भदाणे, पो.हेड.को.सुनिल मोरे, पो.नाइक रामजी गावीत व पो.कॉ सतिश वसावे यांनी महिला व बालिकेस आपल्या सोबत घेऊन शहराला लागून असलेल्या दोन्ही कामगार वसाहतीत, शहरातील आदिवासी वसाहती व आजूबाजूचा शेतमळ्यातील झोपड्यामध्ये तपास केला मात्र कुणिही नातेवाईक आढळून आले नाही मंगळवारी पुन्हा तपास केला तेव्हा दुपारी या बालिकेचे वडिल गुलाब खात्र्या पाडवी राहणार बालाजी पेट्रोलपंप यांची बालिका हरवल्याचे माहिती पोलिसांना मिळाली, तेव्हा पोलिसांनी त्यांचाशी संपर्क साधून पोलिस स्टेशनला बोलविले त्यावेळी त्यानीं बालिका आपलिच असल्याचे पोलिसांना सागितले अखेर पोलसांनी शर्थिचे प्रयत्न करून 24 तासात आपले आई वडिल मिळवून दिले आपले हरवलेले बाळ मिळाल्यामुळे बापाच्या चेहर्यावर हास्य फुलले होते. दरम्यान, बाळा सोबत ताब्यात घेतलेल्या त्या महिलेचे नातेवाईक ही पोलिसस्टेनमध्ये येऊन तिची ओळख पटल्यानंतर तिलाही त्यांचा ताब्यात दिले. पोलिसांचा या स्तुत्य कामगिरीबाबत नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
पोलिसांचे शर्थिचे प्रयत्न
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शहरातील बसस्थानकात एक दोन वर्षीय बालिका चुकून बसस्थानकात फिरत होती त्याच वेळी तेथे असलेली निरूबाई सुकलाल कासार राहणार डेडिया पाडा ही बसस्थानकातच बसली होती ही मुलगी रडत असल्याचे पाहून तिने बालिकेला जवळ घेत ती बालिका कुणाची आहे त्या बाबत आजुबाजूच्या टपर्यावर विचारपूस केली मात्र कुणीही पुढे आले नाही. त्यानंतर तेथे उपस्थित असलेले वाहतुक शाखेच्या पोलिसांकडे घेऊन गेली त्यावेळी या पोलिसांनी तपास केला, मात्र बालिकेचे वारस मिळून आले नाही.