तवेराची झाडाला धडक; महिला ठार

0

चाळीसगाव : भडगाव कडुन चाळीसगाव कडे भरधाव वेगाने येणार्‍या तवेराने झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असुन 2 जण जखमी झाल्याची घटना 13 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास चाळीसगाव भडगाव रोडवरील हिंगोणे गावाच्या आलीकडे रोडवर घडली असुन ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भडगाव कडुन चाळीसगाव कडे तवेरा कार क्र (एमएच 19 एएक्स 6761) भरधाव वेगाने येत असतांना चालक सुनिल चौधरी याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन हयगयीने वाहन चालवल्याने 13 डिसेंबर 2017 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास हिंगोणे गावाच्या अलीकडे तवेराची ठोस रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला लागल्याने झालेल्या अपघातात तवेरात बसलेल्या भारती गोरख भोसले (वय-44) रा आमडदे ता भडगाव ह.मु. दत्तनगर भडगाव या गंभीर जखमी झाल्याने त्यांना चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले तर अपघातात त्यांचा मुलगा बिरबल गोरख भोसले व चाळीसगाव येथील संगीता विजय पवार हे देखील जखमी झाले आहेत. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला बिरबल भोसले यांच्या फिर्यादीवरुन तवेरावरील चालक आरोपी सुनिल चौधरी याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास हवालदार किशोर पाटील करीत आहेत.