तहसीलदारांच्या दालनाबाहेर सेनेचे ठिय्या आंदोलन

0
मुक्ताईनगरात आश्‍वासनाला ‘खो’ ; वाळू वाहतूकदारांवर कारवाईस बगल
मुक्ताईनगर:- शिवसेनेने जलसमाधी आंदोलन दरम्यान रंगेहाथ पकडून दिलेल्या सेक्शन पंप असलेली बोट व अवैधरीत्या वाळू उपसणार्‍या पोेकलँड मालकावर व वाळू ठेकेदारावर 14 दिवस उलटूनही कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे बुधवारी शिवसेनेने जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील दारांच्या दालनासमोर तब्बल दोन तास  निदर्शने आंदोलन व ठिय्या मांडला.
घोषणाबाजीने दणाणले तहसील कार्यालय
शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत अवघे तहसील प्रशासन दणाणून सोडले. महसूल प्रशासन करते काय, वाळू माफियांचे धरते पाय  ! अशी लक्षवेधी घोषणा देत महसूल प्रशासनाच्या अर्थपूर्ण धोरणाचा निषेध करण्यात आला. अवैध वाळू उपसाबाबत 14 दिवस उलटूनही कारवाई न करता शिवसेना तालुका प्रमुखांच्या पुतण्यावर एक ब्रास वाळू चोरीचा गुन्हा ज्या तातडीने दाखल करण्यात आला तसेच तालुका प्रमुखांच्या नावावर एकही ट्रॅक्टर नसतांना त्यांच्या नावाने तहसीलदारांनी का नोटीस काढली याचा जाब निदर्शने आंदोलनात विचारण्यात आला. महसूल प्रशासन विशिष्ट लोकप्रतिनिधींच्या इशार्‍याची बाहुली झाल्याचा आरोप ही करण्यात आला. प्रसंगी तालुकाप्रमुख छोटू भोई, अ‍ॅड.मनोहर खैरनार, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अफसर खान, बंना पाटील, राजेंद्र कांडेलकर, हारुन शेख, राजेंद्र तळेले, गणेश टोंगे, सचिन पाटील,  पंकज राणे, स्वप्निल श्रीखंडे, गणेश पाटील, पंकज कोळी, महेंद्र गवळे, शुभम तळेले, संदीप बगे, प्रफुल्ल पाटील, किरण कोळी, योगेश काळे, सुभाष माळी, सुनील पाटील (तरोडा), मनोज भोई, अशोक कुंभार, साबीर शेख यांच्यासह असंख्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. अवैध वाळू उपसा करणार्‍या व्यक्तींवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे तहसीलदार रचना पवार म्हणाल्या.