तहसीलदारांच्या प्रयत्नाने श्रीगोंदा तालुक्यात एक छावणी मंजूर !

0

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील तहसीलदार महेंद्र माळी यांच्या अथक प्रयत्नाने श्रीगोंदा तालुक्यात  एक छावणी मंजूर झाल्याने परिसरात एकच चर्चेचा विषय बनला होता. श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाने तालुक्यातील अनेक गावात छावण्या सुरू करण्याचे आदेश पारित केले त्यासाठी तहसीलदार कार्यलयाच्या मार्फत प्रत्येक गावातून अहवाल प्रस्ताव मागविण्यात आले त्यातून अनेक गावातून छावणीसाठी प्रस्ताव तहसील कार्यालयात दाखल करण्यात आले.

तालुक्यात मांडवगण परिसरात एक छावणी मंजूर झाली आहे पण तीपण अजून चालू झाली नाही बाकीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. जिल्हाधिकारी मोठ्या प्रमाणात काटकोरपणे तपासणी करत आहेत त्यामुळे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत असेही महेंद्र माळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र दुष्काळाची दाहकता वाढत असताना जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असताना तहसील कार्यालय यांच्याकडून होणारी कागदपत्रांची होरपळ यामुळे मुक्या जीवाचा ससेहोलपट होण्यास तहसील कार्यालयातील बोलकी जनावरे जबाबदार आहेत असेच तालुक्यातील सुजाण नागरिकांचे मत आहे.

प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पडून
श्रीगोंदा तहसील कार्यालय मार्फत पाठविण्यात आलेले सर्व छावणीचे प्रस्ताव तपासणी साठी जिल्हा अधिकारी कार्यालयात पडून आहेत मात्र इकडे जनावरे मरणाच्या दारावर पोहचली असताना जिल्हा अधिकारी कार्यालकडून क्रूर चेस्था केली जात असल्याने पशुप्रेमी मधून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे