भुसावळ- नागपूर रेल्वे विभागात तांत्रीक कामासह दुरुस्तीच्या कार्यासाठी 1 ते 15 जानेवारीपर्यंत ब्लॉक घेण्यात आला असून अप-डाऊन मार्गावरील नागपूर पॅसेंजर तसेच अमरावती-वर्धा पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांचे चांगलेच हाल होणार असून सर्वसामान्यांना परवडणारी पॅसेंजरच दरवेळी रद्द केली जात असल्याने प्रवासी वर्गातून रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त होत आहे.
15 दिवस प्रवाशांचे होणार हाल
गाडी क्रमांक 51285 डाऊन भुसावळ-नागपूर पॅसेंजर आणि गाडी क्रमांक 51286 अप नागपूर-भुसावळ पॅसेंजर तसेच गाडी क्रमांक डाऊन 51262 आणि 51261 अप अमरावती-वर्धा पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन भुसावळ रेल्वे प्रशासनाने केले आहे.