भुसावळ- अप 02597 गोरखपूर-मुंबई ही गाडी 12 मे रोजी तसेच डाऊन 02598 मुंबई-गोरखपूर डाऊन समर स्पेशल गाडी 13 मे रोजी तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती भुसावळ रेल्वे विभागाने दिली. रेल्वे प्रवाशांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.