चोपडा : तालुक्यातील तांदलवाडी ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंच पदावर भाजपचे सुनिल गयभू पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महसूल अधिकारी सैय्यद होते. यापूर्वीचे सरपंच सीताराम बाविस्कर यांच्यावर अविश्वास पारित झाल्यानंतर रिक्त जागेवर ही निवड करण्यात आली.यावेळी ग्रा.पं.उपसरपंच मंगला धनगर,सदस्य संगीता धनगर,आशाबाई भील,रघुनाथ भील हे उपस्थित होते. निवडणुकीसाठी तलाठी कुलदिप पाटील यांनी सहकार्य केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी चोसाका संचालक गोपाळ धनगर, आधार पाटील, राजेंद्र धनगर, नंदलाल धनगर, प्रवीण धनगर, विनोद धनगर, प्रकाश धनगर, धनराज पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुतन सरपंच सुनील पाटील यांचे पं.स.सभापती आत्माराम म्हाळके, ओबीसी सेलचे नाशिक विभागाध्यक्ष प्रदीप पाटील, मुख्यमंत्री मित्र प्रकाश पाटील यांनी अभिनंदन केले आहे.