जळगाव– शहरातील तांबापुरा परिसरात गवळीवाड्यात महादू भिका हटकर या पशुपालकाचे दोन म्हशींचे पारडू लांबवून नेल्याची घटना 22 रोजी पहाटेच्या सुमारास समोर आली आहे.
श्रीकृष्ण मंदिराजवळ गवळीवाड्यात महादू हटकर हे आई, वडील, दोन भाऊ व पत्नी यांच्यासह एकत्र वास्तव्यास आहेत. त्याच्याकडे 35 म्हशी असून दुग्धव्यवसाय करुन त्याचेवर त्यांचा उदरनिर्वाह भागतो. 21 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास म्हशींना चारपाणी करुन महादू हटकर यांचे वडील भिका हटकर हे गोठ्याजवळच खाट टराकून झोपले. 22 रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास महादू हटकर व त्यांचा भाऊ धनराज, वडील असे म्हशींचे दूध काढण्यासाठी गेले असता, याठिकाणी बांधलेले म्शींचे दोन पारडू दिसून आले नाहीत. त्याचा गळ्यातील दोर मात्र सापडला. सर्वत्र परिसरात शोध घेतला असता ते मिळून आले नाही. अखेर महादू हटकर यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यानुसार 25 हजार रुपये किमतीचे दोन पारडू लांबविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.