तांबापुरा येथील खदानीत पडून विवाहित महिलेचा मृत्यू

0

जळगाव । माहेरी आलेली बावीस वर्षिय विवाहीतेचा तांबापुरा येथील खदानीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज समोर आली. ही घटना दुपारी एकच्या सुमारास नातेवाईकांच्या शोधा-शोध नंतर उघडकीस आली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नातेवाईंकाडून मिळालेल्या माहितीनूसार, उशा गणेश शिरसाळे (वय 22) रा. सुरत उधणा येथे सासर तर जळगाव येथील डि मार्ट समोर महिलेचे माहेर आहे. गेल्या तीन महिन्यापासून माहेरी उपचारासाठी आलेल्या उशा या आज सकाळी साडेतीनला पाणी आल्यानंतर पाणी भरले. त्यानंतर चार वाजता प्रातविधीला जाते असे सांगून तांबापुरा येथील खदानीकडे उशा गेल्या. जात असतांना तांबापुरा येथील गवळी वाड्याजवळील खदानीत पडल्या. दोन-तीन तास होवून देखील उशा घरी न आल्याने दोन भावू, आई-वडील व परिसरातील नागरिकांनी उशा यांची शोधाशोध सुरू केली. त्यानंतर उधणा येथील उशा यांचे पती गणेश शिरसाळे यांना फोन करून उशा हरविल्याची माहिती दिली. लगेच शिरसाळे हे जळगावकडे येण्यास निघाले.

दुपारी बाराच्या सुमारास तांबापुरा येथील खदानीत उशा यांचा मृतदेह एका कोपर्‍यात आढळून आला. पोलिसांना खबर देण्यात आल्यानंतर दोन तासानंतर रवी हटकर या पट्टीच्या पोहणार्‍याने खदानीच्या एका कपारीत अडकलेला मृतदेह काढण्यात आला. मृतदेह काढल्यानंतर रुग्णवाहिकेला फोन करून देखील आली नसल्याने रिक्षात टाकून मृतहेद जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईक घेवून आले.

तिन महिन्यापासून माहेरी
उशा यांची सहा महिन्यापूर्वी सासरी येथे प्रसुती दरम्यान मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उशा यांच्या प्रकृती खालविल्याने जळगाव येथील माहेरी उपचारासाठी तिन महिन्यापासून आणले होते. उशा यांना दोन वर्षाचा मुलगा आहे. तर दोन भावू, बहिण आई-वडील असा परिवार आहे. खदानीत मृतदेह असल्याची बातमी वार्‍यासारखी पसरल्यावर तांबापुर्‍यातील अनेकांनी खदानीवर धाव घेत एकच गर्दी केली होती. त्यातच मृत महिलेचे नातेवाईक, पोलिस तसेच मृतदेह दोन-तिन जणांकडून शोध घेतला जात होता. यावेळी मुकेश खिल्लारे, विकास शिंदे, मंगल वाघ, भगवान वाघ, अमोल जाधव, आसीफ शेख, मिलींद सोनवणे, वसीम बापू, विकार खान यांनी मदतकार्य केले.