दहा जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात दंगलीचा गुन्हा
जळगाव – शामा फायर चौकात खेळण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत दोन गटात जोरदार हाणामारीत रस्त्याने जाणारा मोटारसायकलस्वार युवक निलेश भाऊराव सपकाळे (वय ३३ रा.हरिविठ्ठल नगर) हा गंभीर जखमी झाला होता. या युवकाची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात १० जणांविरुध्द दंगलीसह प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांबापुरात झालेल्या दगडफेकीप्रकरणी पोलिस कर्मचारी मुदत्सर काझी याच्या फिर्यादीवरून मोहनसिंग जगदीशसिंग बावरी, भोलासिंग जगदिशसिंग बावरी, योगेश मणिक राठोड, शेख हमीद शेख उस्मान, लुकमान शेख, सलमान शेख कय्युम, जमील शेख उस्मान, शाहरुख इस्माईल बागवान, खलिल शेख उस्मान, शेख जलाल शेख उस्मान रा. सर्व. तांबापुरा यांच्या विरुध्द प्राणघातक हल्ल्यासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.