ताडजिन्सी येथील आदिवासींचे घर आगीत जाळून खाक

0

रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील ताडजिनसी शिवारातील एका आदिवासींच्या घराला लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून आगीत एका गाय ठार झाली आहे. सुदैवाने या  दोन्ही बालके शेजारी झोपलेली असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आगीमुळेसुमारे 80 हजार रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

जिन्सी शिवारातील ताडजिन्सी येथील गट न १०४ या शेतात राहत असलेला  चामरसिंग माठ्या भिलाला हे पत्नी दुसऱ्याच्या शेतात कामासाठी गेलेले होते. तर त्याची ४ व ५ वर्षांची दोन्ही मुले घरापासून थोड्या लांब अंतरावर असलेल्या शेजाऱ्याकडे झोपलेली होती. त्यामुळे ती सुदैवाने वाचली आहेत. रविवारी दुपारी चारच्या सुमारास अचानक चामरसिंगच्या घराला आग लागून आगीत संपूर्णघर व संसारोपयोगी साहित्य जाळून खाक झाले आहे याच ठिकाणी दोन गाई व दोन बैल बांधलेले होते. मात्र आगीच्या झळा लागल्याने बैलांनी व एका गायीने दोर तोडल्याने ते वाचले असून एका गाय आगीच्या भक्षस्थानी पडल्याने ठार झाली आहे.