चेन्नई । तामीळनाडुच्या राजकीय घडामोडी आता निर्णायक वळणावर येवू ठेपल्या आहेत. तामीळनाडुच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पन्नीरसेल्वम की शशिकला मुख्यमंत्रीपदी राहणार हा वाद थेट कोर्टात गेला होता. यावर आज प्रभारी राज्यपाल विद्यासागर राव यांनी पुढच्या आठवड्यात तातडीने विशेष अधिवेशन बोलावून शक्तिप्रदर्शनासोबतच पाठींब्याबाबतही मत आजमावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता हा निर्णय पुढच्या आठवड्यावर गेला आहे. राज्यपालांनी दोघांनीही आपले बहुमत सिद्द करण्याकरिता पुरेसा कालावधी दिला आहे. यात शशिकला यांच्याकडे सर्वाधिक आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा केला जात असला तरी गत दोन दिवसांपासुन पन्नीरसेल्वम यांच्याकडेही आमदारांचा पाठींबा वाढतो आहे.