रावेत : ताथवडे येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते संदीप पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘हमारा साथी’ ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली. ताथवडे, पुनावळे, वाकड, काळा खडक या भागातील नागरिकांसाठी ही हेल्पलाईन चोवीस तास सुरू असेल. यातून पालिकेशी संबंधित समस्या मांडण्यास नागरिकांना सोपे होणार आहे. या वेळी नवीन दिनदर्शिकेचे प्रकाशनही पवार यांच्या हस्ते करण्यात आले. राहुल पवार, स्वप्निल भांडवलकर, विजय दराडे, धनंजय पवार, ॠषिकेश शिंदे आदी उपस्थित होते.
‘गुरूकुलम’मध्ये जेवण साहित्य
एकता फ्रेंड सर्कलच्या वतीने चिंचवड गावातील समरसता गुरुकुलमधील आदिवासी मुलांना दैनंदिन जेवणासाठीच्या ताट, वाटी व इतर साहित्यांचे वाटप करण्यात आले. गुरुकुलमचे गिरिश प्रभूणे यावेळी उपस्थित होते. तसेच ओम शिव मित्रमंडळाच्या वतीने नगरसेवक मयूर कलाटे यांच्या हस्ते संदीप पवार सोशल फाऊंडेशनचे उद्घाटन करण्यात आले. नरसिंह मित्र मंडळाच्या वतीने मामुर्डी येथील माया बोली या अंध मुलांच्या आश्रमास धान्यवाटप करण्यात आले. यावेळी संदीप पवार यांनी आश्रमातील मुलांसमवेत केक कापला. या कार्यक्रमासाठी सतीश पवार व अनिल पवार यांनी परिश्रम घेतले.