तानाजी मालुसरेंचा फर्स्ट लूक प्रदर्शित

0

मुंबई : तानाजी मालुसरे या शूर मावळ्याचे पराक्रम आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’ चित्रपट लवकरच येत आहे. अजय देवगण या चित्रपटात तानाजी मालुसरेची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीझ झाला आहे. या फोटोत अजय हातात तलवार घेऊन आपल्याकडे येणाऱ्या शत्रूच्या हल्ल्याचा विरोध करणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या रुपात दिसत आहे. या चित्रपटात सलमान खान शिवाजी महाराजांच्या तर काजोल शिवाजी महाराजांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.