तापमान वाढीबरोबर गारवा देणार्‍या वस्तुंनाही महागाईची झळ

0

जळगाव । मार्च महिन्यानंतर आता एपिल महिन्यातही सुर्याने आग ओकायला सुरूवात केली असून पारा 42 अंशावर जावून पोहाचला आहे. त्यामुळे साहजिकच गारवा देणार्‍या वस्तुंची मागणी व विक्री वाढली आहे. उन्हाच्या तडाख्याबरोबरच वस्तुंच्या किंमती वाढल्याने ग्राहकां दुहेरी झळ सोसावी लागत आहे. वाढत्या तापमानात गारवा मिळविण्यासाठी सामान नागरिक कुलरचा तर श्रीमंत व्यक्ती व उद्योजनक एसीचा वापर करतात. यावर्षी सामानांच्या सोबती असलेला कुलरच्या किंमती वाढल्या आहेत. महागाईची झळ सोसूनही उष्णतेपासून सुटका करण्यासाठी नव्या कुलरची खरेदी तर अडगळीत पडलेल्या जुन्या कुलरची दुरूस्ती सुरू आहे.

बाजार पेठ सजली
सध्या उकाडा कमालीचा वाढलेला आहे. आत्ताच मे हिटचा अनुभव येत असल्याने तापमानामुळे दुपारी शहरातील रस्ते ओस पडत आहेत. चाळीस ते 42 अंशावर तापमानाची वाटचाल पोहचली असून त्यामुळे सध्या बाजारपेठेत कुलर, एसींची मागणी वाढली आहे. स्थानिक कारखान्यात निर्मित शहरातील अनेक फेब्रिकेशन दुकानदार स्वत डेझर्ट कुलर तयार करून विकत आहेत. याशिवाय इतर ठिकाणावरूनही मोठ्या संख्येने स्थानिक बाजारात कुलर विक्रीसाठी बोलविले जातात. सध्या बाजारपेठ वेगवेगळ्या प्रकारच्या कुलरने सजली आहे. खिडकीच्या आकारा नुसार किंवा घरात ठेवण्यासाठी अगदी दोन फुटांपासून सोडचार फुटांच्या आकारात कुलर तयार करून मिळत आहेत.

वाढत्या उन्हाळ्यामुळे अंगाची विशेष करून डोळ्याच लाहीलाही होत असते. अशावेळी काळे गॉगल्स डोळ्यांसाठी लाभदायक ठरत असून यामुळे डोळ्यांना थंडावा मिळत असतो. तरुणांमध्ये गॉगल्स वापरण्याची जणु क्रेझच झाली आहे. तेव्हा तरूणांच्या तसेच इतर सर्वांच्याच आवडीचे असे विविध रंगावतील स्टायलीश गॉगल्स सध्या बाजारात उपलब्ध झाले आहेत. गोरे गो मुखडे पे काला काला चष्मा असे काही चिव् सध्या शहरात पहायला मिळत आहेत. सेलिबे्ंरटींसारखा लुक येण्यासाठी तरूण-तरूणींकडून विविध स्टायलिश गॉगल्सची विशेष मागणी होत असते.

एअर कंडिशन लावण्याचे फॅड
बर्‍याच ठिकाणी पाणी टंचाई असल्याने अनेक शासकीय कार्यालये, नोकरदार व्यक्ती, व्यावसायिक दुकानात, घरात एअर कंडिशन लावण्याचे फॅड वाढले आहे. कमीतकमी जागेत विविध प्रकाराच्या आकारातील एअर कंडीशन उपलब्ध आहेत. शिवाय सुखवस्तू घरत ती प्रतिष्ठेच वस्तु झाली आहे. आवाक्यात येणार्‍या दरात एअर कंडिशन अनेक कंपन्यांनी शहरातील बाजार पेठेत आणले आहे. यातच वाढत्या तापमानामुळे घरातील एसी.कुलर, पंखे, फ्रिज अशी अधिक उर्जा खेचणारी साधने वापरल्यामुळे वीज जळते. यामुळे भर उन्हाळ्यात चांगले बिल येवून नागरिकांना धसका बसतो.