तापी नगरातील तरुणाची आत्महत्या

0

भुसावळ– शहरातील तापी नगरातील 24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. चेतन गोपालप्रसाद मालवीय (24) असे मयत तरुणाचे नाव आहे. राहत्या घरात छताच्या पंख्याला दोरीने गळफास घेत या तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नसलेतरी आत्महत्येपूर्वी या तरुणाने व्हाटसअ‍ॅपवर आय क्वीट असे स्टेटस ठेवल्याची माहिती आहे. याबाबत सुमित परदेशी यांनी खबर दिली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सारीका खैरनार करीत आहेत.