तापी पात्रात 19 तासानंतर आढळला यावलच्या तरुणाचा मृतदेह

0

यावल- मित्रांसोबत दुचाकीवरून यावलकडे निघालेल्या तरुणाची नदीपात्रात अंघोळ करण्याची इच्छा झाल्यानंतर शेळगाव बॅरेजजवळील तापी नदीपात्रात अंघोळ करताना तरुण बुडाल्याची घटना बुधवारी घडली होती. रात्री उशिरापर्यंत तरुणाचा मृतदेह न आढळल्याने शोधकार्य थांबवून गुरुवारी सुरू करण्यात आले तर तब्बल 19 तासांनी गुरूवारी दुपारी या तरुणाचा मृतदेह आढळला. निलेश सुरेश निंबाळकर (19) असे मयत तरुणाचे नाव असून गुरुवारी दुपारी चार वाजता त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंघोळीचे निमित्त ठरले मृत्यूचे कारण
यावल शहरातील लहान मारुती परीसरातील रहिवाशी निलेश सुरेश निबाळकर आपल्या गणेश (गोलू) लोहार व मनोज बारी या मित्रांसोबत बुधवारी दुचाकीने जळगावी गेला होता. सायंकाळी साडेपाच वाजेेला ते तिघं शेळगावमार्गे यावलला परतत असतांना शेळगाव बॅरेेजजवळ तापी नदीच्या पात्रात साचलेल्या पाण्याच्या डोहाजवळ निलेश निंबाळकरला पोहण्याचा मोह झाल्याने त्यानेडोहात उडी घेतली माात्र तो बुडाला होता. मित्रांनी आरडा-ओरड केल्यानंतर यावल शहरातील सपना घाडगे यांंनी तरुणास वाचवण्यासाठी अंगावरील साडी पाण्यात फेकून मात्र निलेशला वाचवण्यात यश आले नाही. मच्छीमार व पोहणार्‍यांकडून बुधवारी मृतदेहाचा शोध लागला नाही तर गुुवारी सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आल्यानंतर दुपारी 12.30 वाजेेला या भागातील मच्छीमार व पोहणार्‍या बांधवांनी अथक परीश्रम घेत मृतदेह शोधुन बाहेर काढला. याबाबत सुरेश धोंडू निंबाळकर यांच्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यावल ग्रामीण रूग्णालयात डॉ.फिरोज तडवी यांनी शवविच्छेदन केले.