तापी जलवाहिनीला मोठी गळती; महामार्गावरील वाहतूक खोळंबली

0

धुळे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी योजनेच्या मुख्य जलवाहिनीला शनिवारी सकाळी ११ वाजता सोनगीर गावाजवळ मोठी गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीरजवळील मेंढरेश्र्वर महाराज मंदिराजवळ या जलवाहिनीला गळती लागलो असून या गळतीमुळे उडणारा कारंजा चक्क शंभर फुटापर्यत लांब उडत होता.

या गळतीची माहिती मिळताच तापी योजनेवरून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. मनपाचे अधिकारी व कर्मचारी गळती ठिकाणी दाखल होत. दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. काही दिवसांपूर्वी सुलवाडे बॅरेजमधील पाणीसाठा घटल्याने शहरात १५ दिवस कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा शहराचा पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. सोनगिरजवळ लागलेल्या गळतीतून हजारो लिटर पाणी वाहत असून त्याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती.