ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात

0

भुसावळ- ताप्ती पब्लिक इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सोमवारी फॅन्सी ड्रेस कॉम्पीटीशन स्पर्धा घेण्यात आली. शाळेचे प्राचार्य नीना कटलर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत विविध कलागुणांना वाव द्यावा, मोबाईलवर गेम खेळणे टाळावे तसेच देशातील महान थोर नेत्यांबद्दल व त्यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्याानी विविध वेशभूषा साकारत लक्ष वेधले. पहिली व दुसर्‍या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. शाळेतील तब्बल 500 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

विविध वेषभूषांनी वेधले लक्ष
शिवाजी महाराज, जिजाऊ, गांधीजी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, झाशी की राणी, सावीत्रीबाई फुले, प्रतिभाताई पाटील, लोकमान्य टिळक, इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी, भारत माता, मिल्ट्रीमॅन या सारखे थोर नेत्यांच्या विवीध रुपातील वेशभुषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून एनेट मॅथ्थ्यू व मार्था राठोड यांनी काम पाहिले. यातील गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात गौरवण्यात येणार आहे. लीणा लोहार, अंजली जोशी, जास्मीण बाबू, अमरीन शेख, अनिता घोडे, सोनाली मुजूमदार, मेहराज पठान, प्रिया रायन, दीपाली बडगुजर, कल्पना न्हावी, कमल नेहेते, वैशाली पाटील, सुनीता गुप्ता, अनिता भोळे उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सविता सहजे, महेश फालक, दीपक चौधरी, पुष्कर वायकोळे, भूषण पाटील, सचिन पारधी यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचलन सोनाली मुजूमदार व खुषबू अग्रवाल यांनी तर आभार भारती मेढे यांनी मानले.