ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांची धमाल

0

लिंबू चमचासह बेडूक उड्या क्रीडा प्रकारांना उत्स्फूर्त दाद

भुसावळ- विद्यार्थ्यांच्या शारीरीक व मानसिक क्षमतांचा विकास करण्यासाठी शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये 19 रोजी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.
सॅक्रेट हार्ट चर्चचे फादर सुधीर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. प्रसंगी मशाल लाईटिंग, मार्च पास व ख्रिसमस कॅरोल साँग सादर करण्यात आली. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी ड्रिल व 50 मीटर रेस स्पर्धेत भाग घेतला. इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी कोन बॅलन्स, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी फ्रॉग जंप, चौथीच्या विद्यार्थ्यांनी सॅक रेस, पहिलीच्या विद्यार्थ्यांनी अ‍ॅबस्टॅकल तसेच दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी बॅक रनिंग, चौथीच्या विद्यार्थ्यांमध्ये लेमन स्पून स्पर्धा पार पडल्या. पालक वर्गामध्ये महिलांनामध्ये संगीत खुर्ची व पुरुषांनामध्ये बलून स्पर्धा पार पडली.

स्पर्धेसाठी यांनी घेतले परीश्रम
क्रीडा स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका नीना कटलर, खुशबू अग्रवाल, तानिया गोटिंग, भारती मेढे, रीतु प्रभुदेसाई, लीना लोहार, अंजली जोशी, जासीम शेख, अमरीन खान, अनिता घोडे, सोनाली मुजूमदार, मेहराज तडवी, प्रिया रायन, दीपाली बडगुजर, कल्पना न्हावी, अनिता शिंदे, पूनम फालक, पौर्णिमा फलक, किर्ती पाटील, माधुरी कोळी,मनिषा कोळी, मिस सोफिया, मार्था तायडे, स्वाती जावरे, सुवर्णा राजपूत, रुबीना खान, गोपाल जोनवाल, संध्या बनसोड या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.