तामसवाडी येथे भरदिवसा धाडसी घरफोडी

Daring house burglary in broad daylight at Tamaswadi : 65 thousand instead of loot पारोळा : तालुक्यातील तामसवाडी येथे भरदिवसा बंद घरातून चोरट्यांनी 65 हजारांचा ऐवज लांबवला. ही घरफोडी 17 रोजी सकाळी 10.15 ते सायंकाळी सात दरम्यान घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
शेतकरी रामकृष्ण शिवराम महाजन (55, तामसवाडी) यांच्या तक्रारीनुसार, 17 रोजी सकाळी ते शेतात गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील लॉकरमधून 35 हजार रुपये किंमतीचे टोंगल, 30 हजारांची रोकड लांबवली. घरी शेतकरी आल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास हवालदार विजय भोई करीत आहेत.