तामिळनाडूतील अट्टल चोरट्यांना महानगरीतील चोरी प्रकरणी अटक

0

भुसावळ- रेल्वेत चोरी करून बसने पसार होण्याच्या उद्देशात असलेल्या तामिळनाडूतील चौघा चोरट्यांना लोहमार्ग पोलिसांनी संशयावरून अटक केल्यानंतर त्यांच्या ताब्यातून 20 हजार रुपये किंमतीची अंगठी व 22 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला होता. न्यायालयाने आरोपींना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्यांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना दुसर्‍या गुन्ह्यात अटक करण्यात आली. मदनकुमार महेंद्रन (27, त्रिची), सत्यमूर्ती ज्ञानवेल (35, पंगन्नूर), शिवा राजन (45, त्रिचीपल्ली), राजा आरमुगम (39, त्रिचीनापल्ली) अशी अटकेतील आरोपींची नाव आहेत. दरम्यान, याच आरोपींना 16 रोजी अप महानगरी एक्सप्रेसमधून एक लाख 70 हजार 500 रुपयांच्या रोकडसह दागिने लांबविल्याचा आरोप असून त्यांना या गुन्ह्यात (1030/2018) या गुन्ह्यात अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.