तामीळनाडू, महाराष्ट्र उपांत्य फेरीत दाखल

0

मुंबई । तमिळनाडू आणि महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंनी एल आय सी ऑफ इंडिया प्रायोजित व अखिल भारतीय कॅरम फेडरेशन व महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित 44 व्या सब-ज्युनियर नॅशनल आणि आंतर राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत विजय नोंदवत उपांत्य फेरीत धडक मारली. द हलारी व्हिसा ओसवाल समाज हॉल, दादर येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उपांत्यपुर्व सामन्यामध्ये तमिळनाडू संघाने विदर्भवर 3-0 असा विजय मिळवत चमक दाखवली.एम. कौशिक आणि ए.मुसरफ या दोन्ही खेळाडूंनी एकेरीत चमक दाखवली. दुहेरीमध्ये गुरुप्रसाथ व संदीप यांनी चमक दाखवत विजय नोंदवला. महाराष्ट्राच्या संघाने देखील आसामवर 3-0 अशा फरकाने विजय नोंदवत चमक दाखवली.ओजस जाधवने एकेरीच्या सामन्यामध्ये वाकीब इकबाल हुसैनचा 12-5, 7-13, 14-6 असा पराभव केला.दुस-या एकेरीत मयुरेश नाईकने पहिल्या गेममध्ये पराभूत होऊनदेखील साहील रहमानला 6-18, 14-8, 15-7 असे नमविले. तर, ओम तावरे व प्रथम मेहता जोडीने दिपक राय व फारुक शेख जोडीला 21-0, 22-0 असे सरळ गेममध्ये नमवित विजय नोंदवला.

सबज्युनिअर गटाचे निकाल
सब-ज्युनिअर मुले एकेरी (पहिली फेरी) : ओजस जाधव (महाराष्ट्र) वि.वि. सागर कुमार (झारखंड) 21-0, 21-0, ए. मुशरफ (तमिळनाडू) वि.वि.प्रियांशु यादव (उत्तरप्रदेश) 21-1, 20-15,अर्पण बांदिवडेकर (महाराष्ट्र) वि.वि. तय्यब रैला 13-17, 16-9, 21-4, ओम टावरे (महाराष्ट्र) वि.वि. नशित एस.10-5, 18-1, 17-4, सय्यद आसिफ अली (हैदराबाद) वि.वि. किशन टी. 25-0, 25-0, नदीम एसके.नबी (विदर्भ) वि.वि. संदीप एस. (बंगाल) 21-0, 21-0, डेव्हिड बोनल (महाराष्ट्र) वि.वि.प्रविण नाईक (गोवा) 14-1, 10-8, बोईनाव वि.वि.आर.वाय. बॉबी (आंध्रप्रदेश) 13-3, 8-10म 19-9, रितेश मोहिते (महाराष्ट्र) वि.वि. मोहम्मद रुनिथ पाशा (हैदराबाद) 24-1, 24-0.

अन्य सामन्यांचे निकाल
अन्य उपांत्यपुर्व सामन्यांमध्ये बिहारने हैदराबादवर 2-1, दिल्लीने उत्तरप्रदेश संघावर 2-1 असे नमवित उपांत्यफेरीतील आपली जागा निश्‍चित केली. दरम्यान, माजी वर्ल्ड चॅम्पियन पीएसपीबीच्या के.श्रीनिवासने तिसर्‍या बोर्डमध्ये ब्रेक टू फिनिशची नोंद करत 24 व्या अखिल भारतीय फेडरेशन कप कॅरम स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीमध्ये राजस्थानच्या अनसारचा 25-11, 25-0 असा पराभव करत आगेकूच केली. माजी राष्ट्रीय विजेत्या असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या नागसेन एटांबेला तमिळनाडूच्या जी.मुकेशकडून 6-25, 14-25 असे पराभूत व्हावे लागले. दुहेरीमध्ये संगीता चांदोरकर आणि कविता सोमांची या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या जोडीने ममता कुमारी आणि निशा कुमारी या बिहारच्या जोडीला 25-9, 25-6 असे सरळ गेममध्ये नमवित महिला दुहेरीच्या उपांत्यफेरीत धडक मारली.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या झहीर पाशा आणि रवी वाघमारे जोडीने पहिल्या गेममध्ये पराभूत होऊन देखील तेलंगणाच्या एस. आदित्य आणि शेख मोहम्मद जोडीला 6-25, 25-14, 25-10 असे पराभूत करत उपांत्यफेरी गाठली.