तारापूर औद्योगिक वसाहत 40 आस्थापना विरोधात कार्यवाही

0

नागपूर : तारापूर औद्योगिक वसाहतीतील काही आस्थापनांनी कामगारांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम संबंधित कार्यालयाकडे जमा केलेली नाही तसेच काहींनी ती उशिराने जमा केली, याबाबत त्यांच्या विरोधात भविष्य निर्वाह निधी अधिनियम 1952 च्या कलम 7अ अंतर्गत कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आज विधानसभेत दिली. याबाबत अधिक माहिती देताना मंत्री महोदयांनी सांगितले, भादंवि कलम 405 अंतर्गत 406-409 अन्वये प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त, मुंबई यांचेमार्फत पाच आस्थापनांविरुद्ध पालघर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविण्यात आलेली आहे. तसेच कामगारांच्या आरोग्य विषयक अडीअडचणीबाबत बैठक घेऊन संबंधितांना सूचना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.