तारिक अन्वर यांचा राष्ट्रवादीला रामराम; खासदारकीचाही राजीनामा

0

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य तथा राष्ट्रीय सरचिटणीस तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकले असून खासदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यांनी अचानक राष्ट्रवादीला सोडचिट्टी दिल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. तसेच आगामी काळात ते कोणत्या पक्षात जातील याबाबतही उत्सुकता लागून आहे.