तालुकास्तरीय स्पर्धेत एम.एच.एस.एस. महाविद्यालयाचे यश

0

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड; हस्ती पब्लिक महाविद्यालयात आयोजन

शिंदखेडा । येथील एम.एच.एस.एस. कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ तालूकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये विजयी झाला असून जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये हा संघ तालूक्याचे नेतृत्व करणार आहे. दोंडाईचा येथील हस्तीपब्लिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणावर या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत चार संघांनी सहभाग घेतला होता. यात दोंडाईचा येथील हस्तीपब्लिक व आर.डी.एम.पी. तसेच शिंदखेडा येथील एम.एच.एस.एस. व एस.एस.व्ही. पी. एस. कनिष्ठ महाविद्यालयाचा संघाचा समावेश होता.

20 रोजी आयोजन
या स्पर्धेच्या अंतीम लढतीत एम. एच. एस. एस. कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने आर.डी.एम.पी.महाविद्यायाच्या संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकावले. विजयी संघाला क्रिडा शिक्षक प्रा.सतिष पाटिल, प्रा.पी. टी. पाटिल यांनी मार्गदर्शन केले. या सामन्याचे पंच म्हणून रविंद्र महिरे यांनी काम पाहिले. तालूकास्तरीय सामन्यांचे आयोजनासाठी प्रकाश पाटिल यांनी परीश्रम घेतले. 20 सप्टेंबर रोजी धुळे येथील स्टेडीयम वर होणार्‍या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजयी संघाचे नेतृत्व करणार आहे. विजयी संघाचे अभिनंदन डॉ.रमेश देसले , आनंदा चौधरी, प्राचार्य डी. सी. गिरासे यांच्यासह कर्मचार्‍यांनी केले. पाटण येथील आशापूरी हायस्कूलच्या पटांगणावर तालूकास्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत दोंडाईचा येथील आर.डी.एम.पी. महाविद्यालयाच्या संघाला पराभूत करून शिदखेडा येथील एम.एच.एस.एस. कनिष्ठ महाविलयाच्या संघाने उपविजेते पद पटकावले. या स्पर्धेत बेटावद येथील दोन, शिंदखेडा व दोंडाईचा येथील प्रत्येकी एक अश्या एकूण चार संघांनी भाग घेतला होता. मनोज बडगुजर , संदेश बैसाने, वैभव सोनवणे, हर्षल राजपूत, जयेश माळी, दर्शन पाटिल, शुभम पाटिल, गौरव परदेशी, जुगल सोनवणे, सुयोग राजपूत, प्रदिप गिरासे, नयन बडगुजर यांचा विजेत्या संघात समावेश होता.