जळगाव। जळगाव शहरानंतर आता गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी आता प्रत्येक तालुका केंद्रवर सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यातून दिड ते दोन कोटी रुपयांची तरतुद करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. जिल्हा पोलीस दलातर्फे सीसीटीव्ही केंद्राचे (नेत्रकक्षाचे) शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीष महाजन, ग़ुलाबराव पाटील, स्मिता वाघ, हरीभाऊ जावळे, चंदुलाल पटेल, आ. राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, झेडपी सिईओ अस्तिककुमार पांडे यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन; जिल्हा नियोजनातून निधी उपलब्ध करून देणार
मला सीसीटीव्ही चे वायरलेस पासुन ते स्कु्र लावण्यापर्यंतचे सर्व तंत्रज्ञान माहिती आहे कारण मी ही सर्व कामे केलेली आहे. आत सुरू करण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे चांगल्या दर्जाची आहेत. या सीसीटीव्ही कॅमेर्यांचे उद्घाटन तर झाले मात्र हे निरंतर सुरू राहीले पाहीजेत. यासाठी पोलीसांनी आता 24 तास या तंत्रज्ञानाकडे लक्ष देण्याची गरज आहे. कालांतराने याकडे दुर्लक्ष होईल, असे व्हायला नको, अनेक घटना, गुन्हे घडतात या कॅमेर्यांच्या माध्यमांतून या घटना आता कैद होतील. यासाठी मॉनिटरींग, मेंटनन्स नीट झाले पाहीजे. यासाठी काही डोनर आपल्या हाताशी ठेवणे गरजेचे आहेत़ गुन्ह्याचें प्रमाण कमी करण्यासाठी काळजी घ्यावी़ शहरातील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही लावल्यातुळे फायदा होणार आहे़ याची मोठ्या प्रमाणावर प्रसिध्दी करा, शाळेतील ंमुलांची येथे ट्रीप आणुन त्यांना माहिती द्या, यामुळे आत कायद्याची कडक अंमलबजावणी होणार आहे असे त्यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले
या वाळू वाल्यांचा बंदोबस्त करा
कार्यक्रमा दरम्याान सहाकर राज्य मंत्री नाग़ुलाबराव पाटील म्हणोल की, जनतेला माहिती देण्यासाठी सीसीटीव्हींचा उपयोग होणार आहे़ धरणगाव मध्ये देखिल प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही बसविले आहेत़ यामुळे घटनांना आळा बसला आहे़ सामंजस्य असेल तर अशा घटनांना आटोक्यात आणता येते़ यावेळी पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकार्यांना त्यांनी सांगीतले की, साहेबर या वाळू वाल्याचां बंदोबस्त करा, खुप त्रास होतो हो, दिवसाला 100 ट्रक नाशिक, मुंबई हून शहरात कश्या येतात, राज्यांनी प्रजाकडे पहावे, मी आमदार असतो तर गाड्या पकडल्या असत्या पण आता मंत्री करून टाकले, तुम्ही आम्ही बदनाम होवू नका असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला, गाडीचे लाल दिवे काढले तर कुणी सरकत नाही रीक्षा वाले पण आता ताठ होतात असे गमतीशीरपणे ही ते बोलत होते़