पाचोरा । तालुक्यातील शेतकरी वर्गावर अस्मानी संकटामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असल्याने शासनाने त्वरित शेतकर्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासकीय मदत जाहीर करावी, संभाव्य शेतकरी आत्महत्या थांबवावी, अशा मागणीचे निवेदन काँग्रेसतर्फे पाचोरा तहसीलदार बी.ए.कापसे यांना आरोग्य सेलसह शहर आणि तालुका काँग्रेसच्या वतीने देण्यात आले. शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात मका पेरणी करुन ती वखरुन टाकली असुन पुन्हा दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही, त्यामुळे शासनाने त्वरित मदत जाहीर करावी असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतांना यांची उपस्थिती
घटनेचे गांभीर्य ओळखून शेतकर्यांच्या भावना शासनाला त्वरित तहसीलदार यांनी कळवाव्यात तसेच तालुक्यातील बहुतेक शेतकर्यांचे कापूस, दुष्काळग्रस्त बागायती व कोरडवाहूसाठी त्वरित मदतीची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड.अविनाश भालेराव, सचिन सोमवंशी, साहेबराव पाटील, अनिल पाटील, नंदकुमार सोनार, शहराध्यक्ष मुक्तार शहा, प्रा.एस.डी.पाटील, शेख जावेद शेख अजिज, रवींद्र नेवे, संगीता नेवे, अरुण महाजन, प्रकाश , रामदास गायकवाड, विकास वाघ, नागेश दुसाने आदी उपस्थित होते.