तालुक्यातील 12 ग्रामपंचायत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

0

नवापूर । नवापुर तालुक्यात एकुण 12 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिाक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम घोषीत करण्यात आला आहे. राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रानुसार नाशिक,औरंगाबाद,व अमरावती या तीन विभागातील संबधीत जिल्हातील माहे नोव्हेंबर 2017 ते फेब्रवारी 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या तसेच अस्तीत्वात आलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिाक निवडणुकांसाठी मतदान यादीचा सुधारित कार्यक्रम घोषीत करण्यात आला आहे.

यानुसार नवापुर तालुक्सातील एकुण 12 ग्रामपंचायतीची मुदत माहे नोव्हेंबर 2017 मध्ये संपत असल्याने 22 ऑगस्टरोजी नवापुर तालुक्यातील विसरवाडी,खेकडा,खडकी, शेही, गंगापूर,नानगीपाडा,वाटवी,वावडी,शेगवे,वराडीपाडा,भांगरपाडा,अंठिपाडा,या 12 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रारुप मतदान यादि प्रसिध्द करण्यात आलेली आहे. प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीवर 28 ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना नागरीक घेवु शकता. तसेच अंतीम मतदान यादी 1 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.