तालुक्यातील 7 ग्रा.पं.साठी 27 रोजी मतदान

0

शिंदेखडा । तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 7 मे पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. 12 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत असून 11 ते 4.30 वाजेदरम्यान तहसिल कार्यलयात नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. 14 मे रोजी छाननी होणार असून माघारीची मुदत 16 मे आहे. मतदान 27 मे रोजी होणार आहे.

उमेदवारांची जमवाजमव सुरु
गावातील प्रमुख नेतेमंडळींची उमेदवारांच्या तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी लागणारे कागदपत्र जमवाजमव करण्यात दमछाक ऊडत आहे. यासाठी तालुक्याचा ठिकाणी येऊन यातील माहीतगार माणसाची मदत घेत कागदपत्रे मिळवुन घेत आहेत. नामनिर्देशन पत्र छाननीत बाद होऊ नये याची आगोदर पासूनच पॅनल प्रमुख काळजी घेत आहेत. अनेक गावात दुरंगी निवडणूक होणार असून तालुक्याचे लक्ष वालखेडा ग्रामपंचायतीवर लागून आहे. याठिकाणी चुरशीची निवडणूक होणार आहे, असे असले तरी माघारीनंतरच याचे चित्र स्पष्ट होईल. तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीत कुमरेज-परसामळ ग्रुप ग्रामपंचायत, साळवे, वालखेडा, कंचनपुर, कदाणे, वाघोदे, तावखेडा (प्र.बे) या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या ग्रामपंचयतीत प्रथमच लोकनियुक्त सरपंचांची निवड होणार असल्याने या सर्वच गावांमध्ये चुरशीच्या निवडणुक होईल असे चित्र दिसत आहे.