पुणे : फुटबॉल, रायफल शुटींगसारख्या खेळांसह कबड्डीसारख्या पारंपरिक खेळामध्ये स्वत: मैदानात उतरून महाराष्ट्राचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. खेलो इंडिया युथ गेम्स आयोजन समितीतर्फे नॅशनल युवा कोऑपरेटिव्ह सोसायटीने आयोजित केलेल्या स्पोर्टस एक्स्पोमधील विविध खेळांमध्ये स्वत: सहभागी होत ‘खेलेगा महाराष्ट्र जितेगा राष्ट्र’ असा संदेश दिला. केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे बालेवाडीमध्ये शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये हा एक्स्पो भरविण्यात आला आहे. यावेळी राजेश पांडे, नरेंद्र सोपल, श्रीपाद ढेकणे, आशिष पेंडसे, रवींद्र नाईक यांसह क्रीडा अधिकारी उपस्थित होते.