तासिका तत्वावरील शिक्षकांच्या मानधनात वाढ

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या माध्यमिक शाळेत तासिका तत्वावर विद्यार्थ्यांना शिकविणार्‍या शिक्षकांना 54 रुपये प्रतितास प्रमाणे मानधन दिले जात होते. आता त्यांच्या मानधनात वाढ करून पुणे महापालिकेच्या धर्तीवर किमान 12 हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. शहरामध्ये 18 माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये तासिका तत्वावर अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करत आहेत.

त्यांना प्रतितास शिक्षण विभागाकडून 54 रुपये दिले जाते. पुणे महापालिकेच्या माध्यमिक विभागाकडून तासिका तत्वावरील शिक्षकांना 12 हजार रुपये किमान वेतन दिले जाते. पालिकेच्या माध्यमिक विभागाच्या शाळेत तासिका तत्वावर काम करणा-या शिक्षकांना पुणे महापालिकेच्या धर्तीवर किमान 12 हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.