तिकीट तपासणीसाचा काळा कोट आणि आरपीएफच्या गणवेशाचा धाक उपद्रवींमध्ये असणे गरजेचे

0

भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांचे स्पष्ट मत ; इंडियन रेल्वे तिकीट चेकिंग स्टॉफ ऑर्गनायझेशनतर्फे सृजन महोत्सव

भुसावळ- तिकीट तपासणीसाचा काळा कोट आणि आरपीएफचा गणवेश याचा धाक उपद्रवींमध्ये असणे गरजेचे असून काळा कोट पाहताच फुकट्या रेल्वे प्रवाशांमध्ये तसेच आरपीएफला पाहून गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी येथे व्यक्त केले. रेल्वे प्रशाशांसाठी तिकीट निरीक्षक आणि स्टेशन मास्तर यांनाच रेल्वेचे अधिकारी समजले जात असल्याने तिकीट निरीक्षकांच्या वागणुकीवर रेल्वेची प्रतिमा तयार होत असल्याचेही ते म्हणाले. इंडियन रेल्वे तिकीट चेकिंग स्टॉफ ऑर्गनायझेशनतर्फे शनिवारी सृजन महोत्सवाचे आयोजन रेल्वेच्या श्रीकृष्णचंद्र सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

तिकीट निरीक्षकांच्या समस्या सोडवणार -डीआरएम
तिकीट तपासणीसांना कामाचे उद्दिष्ठ देऊ नये, असे वैयक्तिक आपल्याला वाटते, असे सांगून डीआरएम यादव म्हणाले की, तिकीट निरीक्षकांच्या समस्या दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. गाडीत असतांना तिकीट तपासणीसांनी उत्तेजीत होऊ नये, जास्तीत जास्त तिकीट विक्री झाल्यास रेल्वेच्या उत्पन्नात त्याची वाढ होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करतांना तिकीट घेऊनच प्रवास करावा याबाबत जागृती निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमास मुख्य पाहुणे म्हणून डीआरएम आर.के.यादव, वाणिज्य मंडळ व्यवस्थापक व्ही.पी.दहाट, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अजयकुमार, श्याम कुळकर्णी, बी.अरूणकुमार तसेच इंडियन रेल्वे तिकीट चेकिंग स्टॉफ ऑर्गनायझेशन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मनिष श्रृंगऋषी, राष्ट्रीय सहायक महासचीव डॉ.हेमंत सोनी यांच्यासह कोषाध्यक्ष पी.एस.चव्हाण, संघटन सचिव योगेश पंडित, एनआरएमयु.विभागीय सचिव आर.आर.निकम, सीआरएमएस विभागीय अध्यक्ष व्ही.के.समाधिया आदी उपस्थित होते. प्रसंगी स्मृर्ती चिन्ह देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. डीसीटीआय एच.एस.आलूवालिया, संघटनेचे विभागीय अध्यक्ष संजयकुमार दुबे, सचिव दयाराम सिंह, कार्याध्यक्ष विवियन रॉड्रीक्स, कोषाध्यक्ष व्ही.के.सचान यांनीही मार्गदर्शन केले. संघटनेेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन आर.के.यादव यांना देण्यात आले. नवीन विभागीय कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष ए.पी.धांडे, कार्याध्यक्ष विवियन रॉड्रीक्स, सचिव निसार अहमद खान, कोषाध्यक्ष व्ही.के.सचान यांचा समावेश आहे. सूत्रसंचालन ए.एस.राजपूत यांनी केले. सृजन मेळाव्यास मुंबई, नागपूर, भोपाळ, झाशी, सोलापूर येथील तिकीट तपासणीस आले होते.