शहाद्यात चर्मकार समाजातर्फे तहसिलदारांना दिले निवेदन
शहादा । नवापुर येथील मुलीवर अत्याचार करून आत्महत्येस प्रवृत्त करणार्या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी समाजाच्या वतीने आज तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे. सदर मुलीने आत्महत्या केली नसून या तिन्ही नराधमांनी तिचा खुन केला आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. चर्मकार समाजाच्या वतीने तहसिलदार मनोज खैरनार यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा नवापुर येथे 26 जुलाई रोजी इयत्ता बारावीत शिकणार्या विद्यार्थिनीने छळला कंटाळून आत्महत्या केली. याबाबत नवापुर पोलिसांनी जावेद मुनाफ शेख, आरिम घडीयाली व महेश पवार या तिघा नराधमांन अटक केली आहे.
शासनाने या तिन्ही नराधमानवर कठोर करवाई करावी सदर चा खटला हा जलद गति न्यायालयात चलाववा. या खटल्या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणुक करावी. चर्मकार समाज हा शांतता प्रिय समाज म्हणून ओळखला जातो हा समाज मेहनतीने कष्ट करुण आपल्या कुटुंबचे उदरनिर्वाह करित असतो. अशा समाजाच्या विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत करणार्या नराधमांन वर कठोर करवाई करावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल व यास प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा निवेदनात दिला आहे. दरम्यान आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मुख्य चौकतील पाण्याच्या टाकी पासून मोठ्या संख्येने समाज बांधवांनी कैंडल मार्च काढला. तहसील कार्यालयजवालील डॉ. बाबासाहेब अंबेडकर पुतळया जवळ मयत विद्याथिस सामुहिक श्रधंजलि देण्यात आली.
यांची होती उपस्थिती
कँडल मार्च मध्ये मोठ्या संख्येने युवक, युवती, महिला समजबंधव व चर्मकार समाज मंडळ, संत रविदास समाज मंडळ व शहादा रविदास नोकरदार संघाच्या पदाधिकारी यांच्यासह माजी नगराध्यक्ष भीमराव चव्हाण, माजी नगरसेवक हिरालाल अहिरे, चर्मकार समाज मंडळ अध्यक्ष संजय अहिरे, संत रविदास समाज मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र बागले, पितंबर चव्हाण, बालू लिंगायत, हिरालाल रोकडे, योगेश सावंत, चंद्रकांत अहिरे, सुनील सोलंकी, दिनेश अहिरे, शशिकांत अहिरे, भगवान अहिरे, विजय अहिरे,केदार अहिरे, दगड़ू वेंदे, संतोष अहिरे, विश्वेश अहिरे, सुरेश चव्हाण, देवेंद्र चव्हाण, जगदीश अहिरे, शिवसेना शहर प्रमुख अप्पू पाटील, तालुका प्रमुख मधुकर मिस्तरी यासह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.