जळगाव : धावत्या दुचाकीवरून येऊन मोबाइल हिसकावणार्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. त्यांना सोमवारी मुख्य न्यायादंडाधिकारी के. एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 21 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या तिघांनी 22 नोव्हेंबर रोजी श्याम मेडिकल परिसरातून शीतल मोरे यांच्या हातातील 18 हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास केला होता.
जिल्हापेठेतील श्याम मेडिकल परिसरातून शीतल मोरे यांच्या हातातून मोटारसायकलवरून आलेल्या तीन चोरट्यांनी 22 नोव्हेंबर रोजी मोबाइल हिसकावून नेला होता. या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने जयेश उर्फ पाशा देविदास तायडे (वय 19, रा. कांचननगर), हर्षल रवींद्र सोनवणे (वय 19, रा. घरकुल कांचननगर) आणि सचिन दत्तू बारी (वय 22, रा. कांचननगर) यांना अटक केली. त्यांना सोमवारी न्यायाधीश कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 21 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अॅड. हेमंत मेंडकी यांनी कामकाज पाहिले.