तिन तलाक बिल विरोधात मुस्लिम महिलांचा मुकमोर्चा

0

चाळीसगाव । शासनाने मुस्लिम समाजातील तिन तलाक बिल पारीत केल्याच्या निषेधार्थ चाळीसगाव येथे मुस्लीम युवा फाऊंडेशन गृप च्या वतीने दिनांक 8 मार्च 2018 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास येथील हजरत अली चौक नगरपालिका मंगलकार्यालयापासुन जवळपास दिड ते 2 हजार मुस्लीम महीलांनी चाळीसगाव तहसिल कार्यालयावर मुकमोर्चा आणुन तशा आशयाचे निवेदन नायब तहसिलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुस्लिम समाजात तिन तलाकला पूर्वापार पासुन मान्यता आहे परंतु शासनाने नविन बिल तिन तलाक प्रथेविरुद्ध पारीत करुन मुस्लीम समाजावर अन्याय केला. बिल पास करताना मुस्लिम बांधवांच्या प्रतिक्रिया व मते देखील जाणुन घेतले नाही व एकतर्फी चुकीचा निर्णय घेवुन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तिन तलाक कायद्याचे समर्थनार्थ व शासनाने पारीत केलेल्या तिन तलाक बिलाचा निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर नफीसा जावेद शेख, आफरीन शेख अनवर, आयेश कादरी फिरोज शेख, फातीमा झहीर अली शेख, साजीदा बी शेख अनीस, शाहीस्ताबी सलीम शेख, आर्शीन शेख अमजद, शबाना शेख ईब्रहिम, काफीयाबी शेख रियाज, रफीयाबी उमर खान, शमीनाबी ईम्रान शाह, रिझवाना बी कसर अहमद आदी महीलांच्या स्वाक्षर्‍या आहेत.