जळगाव : सालाबादाप्रमाणे यंदाही रविवारी ‘तिबेट दिन’ तिबेटी बांधवांतर्फे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील जी.एस. मैदानावर आयोजित करण्यात आला होता. 1949-50 मध्ये चिनने तिबेटवर हल्ला केल्यानंतर चिनने तिबेट पुर्ण ताब्यात घेतले. तिबेटची आझादी म्हणून हा दिन साजरा करण्यात येतो. कारण भारत देशाने तिबेट देशाला सर्वतोपरी सहकार्य केले आहे. भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच चिनच्या विरूद्ध विविध घोषणा देवून तिबेटी समाज बांधवांनी हा दिन साजरा केला.
जळगाव तिबेटीयन स्वेटर विक्री असोशिएशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 80-100 समाज बांधव जळगावात वास्तव्यास आहे. या दिनानिमित्त समाज बांधव आनंद व्यक्त करून विविध फराळ व मिटाईचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करत आहे. जळगावात चार महिने हे तिबेटीयन बांधव व्यवसायाच्या निमित्ताने हिवाळ्यात येत असतात त्यानंतर कर्नाटक मधील म्हैसुर येथे वास्तव्यास असतात. असोशिएशनचे एन फुरफू, तुक्तेन, कर्मटशी, त्सावांग, निमा, लोन्दे, त्सित्च्यू, युनेन, झबियान पालमो, स्थीयुडंट यांच्यासह तिबेटीयन समाज बांधव यांची उपस्थित होती.