तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक

0

शांघाय । शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानेसुवर्णपदक जिंकले आहे. अभिषेक वर्मा, चिन्ना राजू श्रीधर आणि अमनजीत सिंग या त्रिकुटाच्या शानदार कामगिरीच्या बळावर अंतिम लढतीत कोलंबियाच्या संघाला पराभूत केले. चुरशीच्या झालेल्या या लढतीत भारताने कोलंबियाला 226-221 अशा गुणफरकाने नमवले.

अंतिम फेरीत पहायला मिळाली चुरस
तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या पुरुष गटाच्या अंतिम फेरीत भारतीय संघ आणि कोलंबिया संघात चुरस पाहायला मिळाली. अभिषेक वर्मा, चिन्ना राजू श्रीधर आणि अमनजीत सिंग या त्रिकुटाने अखेरच्या क्षणी जबरदस्त कामगिरी केली. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत अखेर भारताने विजय मिळवला. कोलंबियाचा 226-226 अशा गुणफरकाने पराभव केला. भारतीय पुरुष संघाने उपांत्यफेरीत अमेरिकेला 232-230 अशा गुणफरकाने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दुसरीकडे मिश्र दुहेरीच्या उपांत्यफेरीत अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेन्नम या जोडीचा कोरियाने 152-158 अशा गुणफरकाने पराभव केला होता. दरम्यान, रिओ ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेत सहभागी झालेल्या अतानु आणि दिपिका यांनी रिकर्व्ह प्रकारात निराशा केली.