45,000 cash was stolen by breaking the medical in Bhusawal भुसावळ : शहरातील आमनेर रोडवरील अष्टभुजा देवी मंदिरासमोरील जैन मेडिकल फोडून चोरट्यांनी 45 हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
विकास प्रकाश जैन (भोळे हॉस्पीटलजवळ, भुसावळ) यांची जामनेर रोडवर अष्टभुजा देवी मंदिराजवळ तीन मजली इमारतीत जैन मेडिकल व जनरल स्टोअर्स आहे. रविवार, 20 रोजी रात्री आठ वाजता विकास प्रकाश जैन यांनी नेहमीप्रमाणे मेडिकल बंद करीत घर गाठले व सोमवारी सकाळी आठ वाजता मेडिकल उघडले असता संपूर्ण सामान अस्ताव्यस्त दिसून आले. चोरट्यांनी तिसर्या मजल्यावरील छताचे पत्रे वाकवत मेडिकलमध्ये प्रवेश करीत ड्रावरमधील 41 हजारांची रोकड व मोबाईल मिळून 45 हजारांचा एैवज लंपास केला. या प्रकरणी विकास प्रकाश जैन यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.