तिसर्‍या कसोटीत विंडीजचे पाकला जोरदार प्रत्युत्तर

0

रॉस्यू । विंडीजविरुद्ध तिसर्‍या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी पाकच्या पहिल्या डावातील 376 धावांच्या प्रत्युत्तरात विंडीजने पहिल्या डावात खेळताना तिसर्‍या दिवसअखेर 5 गडी बाद 218 धावा केल्या आहेत. तिसर्‍या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी डावरिच 20 आणि जेसन होल्डर 11 धावांवर खेळत होते. विंडीज अजून 158 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 5 गडी खेळायचे बाकी आहेत. विंडीजकडून रोस्टन चेस 60 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला आहे.

पाकिस्तानने 2 बाद 169 धावसंख्येवरुन दुसर्‍या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. डावातील आठव्याच षटकांत आपली शेवटची कसोटी खेळत असलेल्या अनुभवी युनूसला होल्डरने बाद करत पाकला तिसरा धक्का दिला. युनूसने 18 धावा केल्या. दरम्यान, अजहरने शानदार शतक साजरे करताना 334 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारासह 127 धावांचे योगदान दिले. शतक झाल्यानंतर रोल्टन चेसने अजहरचा त्रिफळा उडवला.