नवी दिल्ली- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत सुरू असलेल्या तिहेरी तलाकच्या विधेयकाच्या चर्चेत सहभाग घेतला आहे. यावेळी त्यांनी तिहेरी तलाकबरोबरच संसदेतील महिलांच्या आरक्षणाच्या मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तिहेरी तलाकपेक्षा केंद्राने महिला आरक्षणाला मंजुरी द्यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
महिलांच्या सामर्थ्याला कमी लेखू नका, तिहेरी तलाकच्या विधेयकाला विरोध नाही, पण पद्धतीला विरोध आहे. महिला आरक्षणालाही केंद्रानं मंजुरी द्यावी. सामाजिक बदल हा झालाच पाहिजे. काय चुकीचं आणि काय बरोबर ही येणारी पिढी ठरवेल, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.