जळगाव । कोपर्डी प्रकरणी सरकारतर्फे फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे न्याय मिळण्याची घोषणा पोकळ ठरली असून मनात असलेली खदखद व निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच कोपर्डी प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाल्याची संवेदना म्हणून मराठा क्रांती मोर्चातर्फे ‘एक दिवा लेकीसाठी’ उपक्रमांतर्गत मुकमोर्चाद्वारे काव्यरत्नावली चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली.