Three acres of cotton were sprayed by unknown persons in Arve Shiwar पाचोरा : शेतमालक नसल्याची संधी साधून अज्ञाताने पाचोरा तालुक्यातील आर्वे शिवारात शेतांमधील उभ्या कपाशीच्या तीन एकर पिकावर तणनाशक फवारल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत रमेश काशीराम पाटील, नवाब तडवी, लतिफ तडवी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीचा व झालेल्या प्रकारचा तपास करून तात्काळ गुन्हा दाखल करावा तसेच महसूल प्रशासनाने संबंधित शेतकर्यांच्या शेताचा पंचनामा करून त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळऊन द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे.
माथेफिरूचा शोध घेण्याची मागणी
तणनाशक कोणी फवारले ? वा उपद्रवीला ही बाब करण्यास कुणी सांगितली ? की त्याने स्वतः हे कृत्य केले ? याचा तात्काळ तपास करण्याची मागणी रमेश पाटील, लतीफ तडवी, नवाब तडवी या शेतकर्यांनी केली आहे. माथेफिरूचा शोध लावुन त्यास योग्य ते शासन करावे, अशी मागणी परीसरातील इतर शेतकर्यांनी केली आहे.