रावेर तहसीलदार यांची कारवाई
रावेर:- तालुक्यातील तीन गावातील प्लॉट धारकांनी शासनाच्या अकृषक कराचा भरणा न केल्याने तब्बल 22 प्लॉट सरकार जमा करण्याची धडक कारवाई तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. यापूर्वी थकबाकी न भरणार्या 15 टॉवरला सील ठोकण्यात आले होते. तालुक्यातील सावदा येथील दोन प्लॉट धारक असून चिनावल येथील 11 तर रोझोदा येथील सात प्लॉट धारकांकडे एकूण 22 जणांकडे एक लाख 19 हजार 204 रुपयांची थकबाकी असल्याने ही कारवाई करण्यात आली.