नवी दिल्ली। केंद्र सरकारने आज राज्यसभेत ‘तीन तलाक’ बिल मंजुरीसाठी ठेवले जाणार आहे. लोकसभेत हे बिल मंजूर झाले आहे. मात्र राज्यसभेत सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ कमी असल्याने मोठे आव्हान आहे. राज्यसभेत विरोधकांचे बहुमत आहे त्यामुळे मोदी सरकार पुढील आव्हान वाढले आहे. दरम्यान मोदींनी संसद भवनात भाजप नेत्यांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत भाजप अध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंह, वित्त मंत्री अरुण जेटली, नितिन गडकरी यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहे.
कॉंग्रेससह अन्य विरोधी पक्षांकडून या विधेयकाला संयुक्त समितीकडे पाठवावे अशी मागणी होत आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना याबाबत पत्र देखील देण्यात आले आहे.