जळगाव – सुप्रिम कॉलनीत राहणारी 35 वर्षीय विवाहिता घरात कोणालाही न सांगता 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 वाजे दरम्यान घरातून निघून गेल्या असून एमआयडीसी पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सविता मधुकर पवार (वय-35) रा. पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी ह्या 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घरात कुणालीही काहीही एक न सांगता घरातून निघुन गेल्या आहेत. मधुकर आत्माराम पवार यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ राजाराम पाटील करीत आहे.