तीन दिवसीय कला महोत्सवाचे आयोजन

0

जळगाव । 10,11 व 12 जानेवारी रोजी विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे ‘कला महोत्सव’ व‘रंगतरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य, ललित कला हे 5 मुख्य कला प्रकार व 16 पाककला प्रकार सादर होणार आहे. विवेकानं प्रतिष्ठानच्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी या कला प्रकारांमध्ये सहभाग घेतला आहे.

या उपशाखांचे विद्यार्थी होणार सहभागी
विद्यार्थ्यांनी कला आत्मसात करणे हा या कार्यक्रमा मागचा प्रमुख उद्देश असून या कार्यक्रमामध्ये विवेकानंद प्रतिष्ठानच्या डॉ.अविनाश आचार्य विद्यालय, ब.गो. शानभाग विद्यालय, वि.प्र.इंग्लिश मिडीयम स्कूल, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, श्रवण विकास मंदिर या शाळांतील नर्सरी पासून ते 10 वी पर्यंतचे विद्यार्थी सहभाग घेणार असून या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी सुगम गायन, समुह गायन, विडंबन नाट्य, मुक नाट्य, एकांकीका, समुहनृत्य, एकलनृत्य, वाद विवाद, रांगोळी, वकृत्व, एकल वादन, समुह वादन, प्रतिकृती बनविणे, किल्ले बनविणे, निबंध स्पर्धा, चित्रकला अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार असू या स्पर्धांमध्ये विवेकानंद प्रतिष्ठानच्या शाळेतील विद्यार्थी यामध्ये सहभाग घेणार आहे. एकूण विवेकांनद प्रतिष्ठानच्या पाच विद्याशाखांमध्ये शिकणार्‍या शिशुगट, बालगट, कुमारगट एकूण 300 विद्यार्थी सहा मुख्य कलाप्रकारांसह 16 पाककला प्रकारात सहभागी होतील.