नागपूर : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी सोमवारी मध्यरात्री महामार्गावर जगदलपूरवरुन हैदराबादकडे जाणार्या तेलंगण परिवहन मंडळाच्या तीन बसेस जाळल्या. तसेच बसमधून प्रवास करणार्या एका निवृत्त पोलिस कर्मचार्याचीही माओवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. जवळपास 100 माओवादी सुकमा-हैदराबाद महामार्गावर आले. त्यांनी महामार्गावर तीन बसेस आणि तीन ट्रक जाळले. यातील एका बसमध्ये पोलिस दलातील निवृत्त कर्मचारी प्रवास करत होता. माओवाद्यांनी त्याची हत्या केली. जवळपास दोन तास माओवाद्यांचा हा धुमाकूळ सुरु होता. शुक्रवारी तेलंगण सीमेवर छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षादलांनी माओवाद्यांवर कारवाई केली होती. या चकमकीत 10 माओवादी ठार झाले. तर एक जवान शहीद झाला होता. या कारवाईचा बदला माओवाद्यांनी घेतल्याचे समजते.